Skip to main content

बिंदुसरा पूल - नेमकं यश कोणाचं अन त्रास कोनामुळं ?



श्रेयवादात वाहतंय पुलाखालून पाणी



  गेली दोन महिने बीड मधील रहदारी हा मोठा पेच म्हणून समोर आला अन दोन बळी घेऊन देखील बसला. यापुढेही शहरातील वाहतूक मोंढामार्गे वळवून त्या परिसरातील नागरिकांनाहि याचाच त्रास सहन करावा लागला आहे. सगळा उन्हाळा गेला तरी या पुलाबाबत कोणीही लोकप्रतिनिधीने कसलीच हालचाल केली नाही. जेव्हा पहिल्या पावसात पर्यायी बनवलेला पूल वाहून गेला तेव्हा शहरातील या प्रश्नाची कणव  सगळ्यांनाच आली. पूर्ण उन्हाळ्यात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी काय झोपा काढत होते का? पर्यायी रस्ता पावसाळ्यात कुचकामी ठरणार आहे माहित असतानादेखील सत्ताधाऱ्यांकडून यावर सपशेल मौन बाळगण्यात आले. चालू आहे वाहतूक म्हणून प्रवाशांनीही दाखल घेतली नाही मात्र १२ जूनच्या पावसात पुलाच्या वरून बिंदुसरा खळाळली तेव्हा मात्र सर्वांना पुलाची जाण आली. या मतदारसंघाचे आमदार हे काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री होते त्या काळातही या निजामकालीन दुरुस्तीला त्यांनी एवढे महत्व दिले नाही. मात्र आता भाजपच्या सत्तेच्या काळात केंद्राकडून थेट कामाला सुरुवात करा म्हणून फर्मान निघते तेव्हा त्यांच्या २ वर्षांच्या पाठपुराव्याला यश आल्याचे प्रसिद्धीपत्रक वर्तमानपत्रात छापून येते. याच पाठपुराव्यातून हे काम झाले असेल तर मुंडे भगिनींनी कशाचा पाठपुरावा केला आहे? आणि त्यांच्याकडूनही अगदी तशाच प्रकारचे पाठपुराव्याची पत्रक कसे काय निघाले? श्रेयवादात शहरवासीयांच्या सहनशीलतेचा अंत सरकार कधीपर्यंत पाहणार आहे? 
पर्यायी रस्त्याच्या उदघाटनप्रसंगी उपस्थित मान्यवर!

   जर पत्रक एकसमान निघत असेल तर ते सयुंकरित्या काढायचे! यातून नेमका पाठपुरावा कोणी केला हे तरी जनतेला स्पष्ठ होऊंद्या. आणि आज जे थेट कामाचे फर्मान निघाले आहे यातून चारपदरी पूल होणार आहे ते उत्तम आहे याबद्दल अभिनंदन मात्र शहरवासीयांचे आणि या बीड शहरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे जे हाल यापूर्वी या अडगळीत ठेवण्यात आलेल्या पुलामुळे झाले याला जबाबदार कोण आहे? एवढा मोठा राष्ट्रीय महामार्ग आणि २०० मीटरच्या पुलामुळे सदा वळवण्यात येतो ते सत्ताधाऱ्यांना कितपत योग्य वाटत होते? आधीच शहर भकास, स्वछता म्हणून किंवा पर्यटन म्हणून काडीची किंमत नसताना पुलामुळे बीड शहर नको रे बाबा म्हणायची वेळ प्रवाशांवर आणण्यास आजघडीला जबाबदार कोण आहे? 
   एकूणच या बिंदुसरा पूलप्रकारात आजघडीचे सत्ताधारी आणि काही काळापुर्वीचे सत्ताधारी हे दोन्ही जबाबदार आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीत जर श्रेय येत असेल आणि यातून कामे रखडत असतील तर सर्वसामान्यांनी याचा काय अर्थ घ्यायचा? जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी आपले कार्य तत्परतेने करत वाहिलेल्या पुलाला मलमपट्टी केली मात्र पर्यायी रस्ताच मुख्य रस्ता समजणाऱ्या लोकप्रतिनिधींना लक्ष घातले असते तर शहरवाशियांवर हि वेळ आलीच नसती याची दखल आता सर्वसामान्य मतदार घेतील!


धनंजय गुंदेकर - 9689043949

Comments

Popular posts from this blog

शतप्रतिशत राजकारण !....जिल्ह्यातील राजकारणावर 'नाण्याच्या' दोन्ही बाजूने 'कटाक्ष' नजर

१. बीड राष्ट्रवादीत युवा पिढीचे धुमशान  पक्षश्रेष्ठींकडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे पक्षसत्तेच्या चाव्या    स्थापनेपासून सत्तेत राहिलेल्या पक्षाची कधीनव्हे ती पूर्णत्वाने सत्तेबाहेर फेकली गेलेली अवस्था आजघडीला बीड जिल्ह्यात झालेली असताना पक्षश्रेष्ठींकडून याबाबत दखल घेतली जाऊन या पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी, झालेल्या दगाफ़टक्यासाठी, केलेल्या विश्वासघाताची फेड करण्यासाठी सळसळत्या रक्ताच्या, धुमशान घालत आपल्या हाती घेतलेल्या कामाची परिपूर्ती करणाऱ्या युवाशक्तीच्या हाती पक्षवाढीच्या चाव्या देण्यात आल्या आहेत.     येणाऱ्या पिढ्यानपिढ्या चालणाऱ्या पक्षविस्तारासाठी अशाप्रकारचे धाडस दाखवणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा बीड जिल्ह्यातील एकमेव पक्षही ठरला आहे. राष्ट्रवादीच्या जेष्ठांनी जिल्हाध्यक्षपदी निवडलेल्या बजरंग सोनवणेंना या पदासाठी योग्य समजत या निवडीबाबत आभार व्यक्त तर केलेच आहे शिवाय या जिल्ह्यातील गटबाजीला आला घालण्यासाठीहि हि निवड केल्याचे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या मनोगत बैठकीत व्यक्तही केले. सर्वसाधारण परिस्थितीतल्या आणि आपल्या मातीशी नाळ जो...